कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
माली पिंपळगाव : सालबादा प्रमाणे याही वर्षी वर्धापनदिनाचा निमित्ताने व गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माली पिंपळगाव संगितमय श्रीकृष्ण चरीञ कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि.05 ते 09 एप्रिल 2024 दरम्यान चालणार आहे. हा कार्यक्रम सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने गेल्या 26 वर्षी पासुन हा सप्ताह चालु आहे. या वर्षी या सप्ताहाचे 27 वर्षे आहे, या पाच दिवसाच्या नियोजना मध्ये दररोज सकाळी श्रीमद्भगवत गीता पारायण, दुपारी प्रवचण व संध्याकाळी संगितमय श्रीकृष्ण कथा आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी दररोज सकाळी श्रीमद्भगवत गीता पारायण प.पु. महंत श्री दत्तराज बाबा रूध्दपुर हे घेत आहेत. या वर्षी श्रीमद्भगवत कथेचे प्रवक्ते महात्मा श्री संकेत मुनी लाड हे आहेत. अत्यंत चांगल्या पध्दतीने ते भागवत कथेचे निरोपन करत आहेत. तसेच दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज होत असलेल्या प्रवचना मध्ये मध्ये अनुक्रमे प.पु.त. मालीनीताई पंजाबी, प.पु.ई. श्री रमेश दादा पातुरकर , प.पु.ई. रमेश दादा शास्त्री, प.पु. महंत श्री विश्वानाथ बाबा व शेवटच्या दिवशी प.पु. महंत चिंतनीजनक श्री. बाभुळगावकर बाबा शास्त्री याचे संध्याकाळी प्रवचन होऊन कार्यक्रमची सांगता होणार आहे. शेवटचा दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात भाविक श्रवणाचा लाभ घ्यावा असे गावकरी मंडळी सागितले आहे. मोठ्या प्रमाणात तरूणांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमा मुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत धार्मिक कार्यक्रमा मुळे शांतता, सलोखा निर्माण होतो व गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाविकांनी जास्तीत जास्त श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प.पु.श्री रूस्तुम राज बाबा पंजाबी यांनी केले आहे.





Social Plugin