Ticker

6/recent/ticker-posts

कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी वाढवले .


पाटण  ( दिनकर वाईकर )

कोयना धरणाच्या पूर्वेकडे सिंचनासाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढल्याने धरण आपत्कालीन ( विमोचक ) दरवाजातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे . सिंचनासाठी आता प्रतिसेकंद तीन हजार क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली .

    पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० व आपत्कालीन दरवाजातून ५०० असे एकूण प्रतिसेकंद २६०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येत होते . सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढल्याने शनिवारी सकाळी पायथा वीजगृहातून २१०० व आपत्कालीन विमोचक दरवाजातून ९०० असे एकूण प्रतीसेकंद ३००० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आले आहे . सध्या धरण पायथा विजगृहातील २० मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे ४० मेगॅवॅट वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० व आपत्कालीन विमोचक दरवाजातून ९०० असे प्रतिसेकंद ३००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे .

फोटो - कोयना धरण पायथा वीजगृह व आपत्कालीन ( विमोचक ) दरवाजातून शनिवारी पूर्वेकडे प्रतिसेकंद एकूण तीन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे