Ticker

6/recent/ticker-posts

पुलावरील वाहतूक वळविल्याने वाहतुकीची कोंडी बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्यांवर नागरिकांकडून कारवाईची मागणी


प्रतिनिधी दीपक गुरव@  चाळीसगाव

     शहरातील हॉटेल दयानंद ते सदानंदपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, या कामामुळे शहरातील इतर रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमितपणे बेशिस्तपणे रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्यांवर तसेच बेशिस्तपणे दुचाकी व चार चाकी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या हातगाड्यांमुळे दुचाकी व चार चाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. तसेच सुट्ट्या असल्याने रस्त्यावरील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्यांच्या कडेला लावण्यात आलेल्या हातगाडी तसेच व्यापारी संकुलाबाहेर पार्किंगची सोय नसल्याने संकुलाबाहेर बेशिस्तपणे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोडींचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांना पायी चालणे कठीण झाले आहे. शहरात दुचाकी व चार चाकी वाहनधारकांची संख्या वाढल्यामुळे शहरातील रूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.