बुध प्रकाश राजेघाटगे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध ता. खटाव मधील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी (एन एम एम एस ) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे .कु . तन्वी विकास पात्रेकर 136 ,कु . श्रेया वैभव लोहार128, कु .अस्मिता चंद्रकांत चव्हाण 118 या विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे .
या विद्यार्थिनींना प्रत्येकी 12000 रु चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे .याबद्दल विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांचे विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे ,पर्यवेक्षक संजय कांबळे तसेच सरपंच सौ सुजाता बोराटे ,उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या . तसेच सारथी शिष्यवृत्ती 12 विद्यार्थीयांना प्राप्त झाली आहे .कु . तीर्थ राजेंद्र सूर्यवंशी 124, यश गणेश माने 119, कु श्रेया सखाराम फडतरे 114 , कु . नम्रता शरद सातपुते 99 , कु . समीक्षा गजानन जगदाळे 99 , कु श्रद्धा दत्तात्रय फडतरे 98 , कु अनुजा जालिंदर फडतरे 91, कु .श्रेया नितीन जाधव 90 , कु . पूर्वा किरण जगताप 78 , कु प्राजक्ता विशाल गोडसे 77 , कु सिद्धी हनुमंत फडतरे 75 ,श्रीकांत संतोष फडतरे 75 या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9600रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे .या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले .या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभागप्रमुख भगवान प्रभाकर सरवदे, नाना तात्याबा दडस , कु माधुरी तानाजी च०हाण , नितीन सुधाकर नारागुडे , तानाजी मारुती पाटील , खाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले . अथर्व प्रदीप मेळावणे 110 गुण या विद्यार्थ्याचे एका गुणामुळे गुणवत्तायादी मधील संधी गेली .या परीक्षेत 37 विद्यार्थी बसले त्यापैकी 30 विद्यार्थी पात्र झाले आहेत .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बुध व बुध पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले . तसेच मंथन बाह्य स्पर्धा परीक्षा यामध्ये देखील विश्वजीत नाना दडस 7वी , जगदाळे जान्हवी 6वी , व श्रेया वैभव लोहार राज्यात ,जिल्हयात व केंद्रात स्थान मिळवले आहे , 6वी 18 विद्यार्थी, 7वी 13 विद्यार्थी, 8 वी 5 विद्यार्थी परीक्षेला बसले होते .सर्व विद्यार्थी मंथन परीक्षेत यशस्वी झाले . त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले .





Social Plugin