Ticker

6/recent/ticker-posts

मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ पासुन मतदान केंद्रावर रांगा



प्रतिनिधी :- सचिन ठुले एरंडेश्वर

  ता.पुर्णा :- एरंडेश्वर - परभणी लोकसभेसाठी शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदान झाले आहे. मतदानासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे दिसत आहे मतदाना करीता विविध मतदान केंद्रावर सकाळी  7 वाजल्यापासून . प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. व लोकशाहीचा उत्सवात नव मतदारांनी देखील आपल्या सहभाग नोंदवला आहे.प्रशासनाकडून  मतदान प्रक्रिया शांततेत राबवली जात असून ठिक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व आरोग्य विभाग यांच्या कडून मतदारांसाठी    उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मेडिसिन व डॉक्टरांची टिम व आशा स्वयंमसेविका उपस्थित होत्या.