Ticker

6/recent/ticker-posts

जय बजरंग व्यायाम मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे


प्रतिनिधी दीपक गुरव

मेथील महाराणा प्रताप चौकातील पाटील वाडा येथील जय बजरंग व्यायाम मंदिरास १०० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त शताब्दी महोत्सव वर्ष हनुमान महायज्ञ हनुमान जन्मोत्सव, हनुमान मूर्ती महास्द्र अभिषेक तसेच हनुमान मूर्ती मिरवणूक व महाप्रसाद भंडारा आयोजित केला होता. मिरवणूक दत्त मंदिर, भाजी मार्केट ते जय बजरंग व्यायाम मंदिर पाटील वाडा अशी गाजत वाजत काढण्यात आली होती.

यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, माजी खासदार उन्मेष पाटील, बाळासाहेब चव्हाण, मिलिंद देशमुख, सुनील देशमुख, उत्तम पहेलवान चौगाये, उत्तम पहेलवान, सुनील पाटील, प्रेमसिंग राजपूत, चरिंद्रसिंग राजपूत, प्रदीप राजपूत, जितेंद्र राजपूत, दीपक राजपूत, जितु जाधव, सुजित राजपूत, सरदारसिंग राजपूत, भरत राजपूत उपस्थित होते.