प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव चाळीसगाव शहरात वाहतुकीची होत असलेली कोंडी पाहता बायपासमार्गे जाणाऱ्या अवजड वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. मात्र बायपासवरील टोल वाचवण्याच्या प्रयत्नात शहरातून अवजड वाहने धावत असल्याची चर्चा होत आहे. काही सजग नागरीकांनी देखील सोशल मीडियावर अजवड वाहतुक करणाऱ्या वाहनांचे फोटोच अपलोड केले आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीला एक प्रकारे पुष्टीच मिळत आहे. आता या वाहतुकीला कुणाची परवानगी आहे अशी चर्चा होत आहे.
चाळीसगाव शहरातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा हे भले मोठे कंटेनर टोल वाचवण्यासाठी धुळे रस्त्याकडून अवजड वाहने शहरातुन प्रवेश करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कडून वळण घेऊन हिरापूर रस्त्याने शहरातुन भरधाव वेगाने जातात असे सोशल मीडियावर सजग नागरीकांनी म्हटले आहे. याअवजड वाहतुकीमुळे शहरातील पायी चालणाऱ्या नागरीकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या अवजड वाहनांमुळे भविष्यात अपघातासारखी दुर्देवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल देखील नागरीकांनी केला आहे. वास्तविक पहाता शहरात अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आहे. वाहतुक शाखेचा स्वतंत्र विभाग असुन सुद्धा या अवजड वाहनांना कोणताही पोलीस अधिकारी आळा घालण्यासाठी पुढे सरसावत नाही असे सोशल मीडियावर सजग नागरीकांनीआपली व्यथा मांडतांना म्हटले आहे.
या बेकायदेशीर अवजड वाहनांना पोलीस विभागा कडून येवढी मोकळीक का? हा प्रश्न साहजिकच पडल्या शिवाय रहात नाही. रात्रीच्या वेळी या भल्या मोठ्या कंटेनर मधून वेगळी काही वाममार्गाने वाहतूक तर होत नाही. ना ? असा विचार करायला सुद्धा वाव मिळतो असे देखील नागरीकांचे म्हणणे आहे. बायपासवरील टोलनाक्यावर या अवजड वाहनांची नोंदणी, फोटो सेशन होते. त्यामुळेच गैरप्रकार टाळण्यासाठी ही वाहने शहरातून प्रवेश करीत असावेत अशी शक्यता देखील सजग नागरीकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. या प्रकाराची चर्चा होत आहे.





Social Plugin