प्रतिनिधि कृष्णा महाले कल्याण
: विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरील कल्याण पूर्व मधील साई नगर,महालक्ष्मी शॉपिंग,नेहरू नगर,कैलास नगर, रायगड कॉलनी,विनायक कॉलनी,मनीषा कॉलोनी,आनंद नगर,कृष्णा कॉलनी,राजा शिवाजी हायस्कूल,कमला देवी कॉलेज ,तसेच खडेगोलावली येथील गंगा विहार,पंचवटी कॉलनी,रामकृष्ण ,पार्वती नगर हा पूर्ण परिसरात या पावसाळ्यात जलमय होणार आहे.
याचे मुख्य कारण विठ्ठलवाडी स्मशान भूमी येथील नाल्याची उंची कमी आहे तसेच त्या खालचा बोगदा हा फक्त 8 फूट रुंदीचा आहे.तसेच या वर्षी कल्याण डोंबिवली महानगर पालिके तर्फे नाल्याच्या शेजारी भराव टाकून भाजी मार्केट,शॉपिंग सेंटर बनविण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे नाला खूपच कमी रुंद राहिला आहे.पर्यायाने पाण्याचा निचरा होणार नाही आणि मागील सर्व विभागात पाणी तुंबनार आहे.या परिसरात तीन शाळा,कॉलेज ही आहेत तसेच एस टी बस डेपोही आहे.त्यामुळे जराही पाऊस झाला तरी पाणी भरणार.
जर पावसाळ्यात हा परिसर जलमय झाला आणि एखादे अघटीत किंवा जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका घेणार आहे का. कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थापन होण्यापूर्वी पासून येथे नागरिक येथे राहत आहेत.त्यांना सुविधा देणे हे येथील खासदार, आमदार महानगर पालिका यांची जबाबदारी आहे.पण ते सर्व आपली जबाबदारी न पाळता विकासाच्या नावाने हायफाय शॉपिंग मॉल बांधण्याच्या मागे लागले आहे.
स्थानिक नागरिकांनी खासदार यांना या बाबत २०२१ सालापासून पत्र व्यवहार केला आहे.तरीही त्याच्यावर काही उपाय झाला नाही म्हणजे नेते व महानगर पालिका आयुक्त,प्रशासन किती कर्तव्य निष्ठ आहेत हे लक्षात येते.पण येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी जर हा नाला रुंद व त्याची उंची वाढली नाही तर पावसाळ्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या नुकसानीस सर्वस्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदार राहतील.असे या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त अधिकारी यांना स्थानीक नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे





Social Plugin