Ticker

6/recent/ticker-posts

आर जे चवरे विद्यालयाचे होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत नेत्रदीपक यश

कारंजा प्रतिनिधी   गुणवंत राठोड 

दिनांक 7 एप्रिल 2024 रविवार रोजी होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेचा अंतिम फेरीचा निकाल घोषित झाला. त्यामध्ये आर जे चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट मधील  वर्ग नववीचा विद्यार्थी अथर्व ठाकरे याने सुवर्णपदक व सई धोटे हिने कांस्यपदक प्राप्त केले  वर्ग सहावी मधून पार्थ तायडे, पार्थ बगडे यांनी रजतपदक तर वेद कस्तुरे, वरद जमाले, विराज गोफणे यांनी कांस्य पदक प्राप्त करून विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांचा मुंबई येथे वैज्ञानिक डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे, डॉक्टर सुनील कांबळे ,होमी भाभा डायरेक्टर श्री चव्हाण सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने मेडल व प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.उल्लेखनीय बाब

 म्हणजे वाशिम जिल्ह्यातून सर्वात जास्त मेडल मिळवणारी आर जे चवरे  हायस्कूल व कॉन्व्हेंट एकमेव शाळा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अथर्व सुनील ठाकरे याला होमी भाभा बक्षीस समारंभात इतिहासात प्रथमच विद्यार्थ्याला मत मांडण्याची संधी देण्यात आली. 

मुंबई येथे त्याने आपल्या खास शैलीत आपले मत व्यक्त करून सर्वांना कारंजा लाड व आर जे चवरे हायस्कूलची ओळख करून देत आपल्या वक्तृत्व शैलीची मुंबई येथे छाप पडली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कारंजा एज्युकेशन सोसायटी चे सचिव श्री अमोलभाऊ चवरे, सदस्य, जे सी हायस्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आर जे चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.