मेरा बु.प्रतिनिधि (राहुल डोंगरदिवे)
अनुसुचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा कोलवड ता. जि. बुलडाणा येथील इयत्ता 10 वी ची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राहिली असून परिक्षेला प्रविष्ठ असलेल्या 30 विदयार्थ्यापैकी प्राविण्य श्रेणीत 16, प्रथम श्रेणीत 14 विदयार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेतुन प्रथम संदेश किशोर शेजोळ 91.40, द्वितीय प्रणव प्रमोद इंगळे 85.60, तर तृतीय अभिषेक रमेश घुगे 83.20 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तर तनिष सिरसाट 82.80, सुरज मोरे 82, लौकिक जाधव 81.80, रुपेश मोरे 81.20, सिध्दांत शेगोकार 79.6, मयुर सावळे 79.6, कुणाल गायकवाड 79.4, हर्षल मोरे 79.2 गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विदयार्थ्याचे श्री. सुनील वारे प्रादेशिक उपायुक्त स.क. विभाग अमरावती, डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण बुलडाणा तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागसेन वाकोडे, वर्गशिक्षिका कु. स्नेहल काळवाघे तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन तथा कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





Social Plugin