कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
गुरूपिंप्री: वाढत्या उष्णते मुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी ही कमी झाली आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विहीर व बोर यांना पाणी कमी आल्याने पाण्याची पातळी ही वाढली नाही. सतत कमी होत जात असलेल्या पाणी पातळी मुळे पाणी टंचाई हे मोठे संकट उभे राहिले आहे. या पाणी टंचाई मुळे नागरीकांचे हाल होत आहेत. त्या मुळे या वर उपाय योजना होणे गरजेचे आहे. सतत नागरीक मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणा वरून पाणी आणण्यासाठी जात आहे.
त्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात पाणयाचा अभावी हाल होताना दिसतआहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच पाण्याचे टॅंकर चालु आहे, एक गल्लीत टॅंकर नंबर प्रमाणे येण्यासाठी दहा ते बारा दिवस लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतत सामान्य नागरिकांचे पाण्या अभावी हाल होत आहेत, त्या सर्वांनी एकत्रित येऊन कायम स्वरूप गावातील नागरीकाचा विचार घेऊन योजना करणे गरजेचे आहे. पुढील काळात पावसाच्या पाण्याचे कशा प्रकारे नियोजन करता या साठी चर्चा होणे गरजेचे आहे. या मुळे पाणी टंचाई वर येत्या काळात मात करता येईल व नागरीकांचे हाल कमी होतील, त्या साठी उपाय योजना करणे अपेक्षित आहे.





Social Plugin