Ticker

6/recent/ticker-posts

देवडोंगरी येथे भर उन्हात मतदारांच्या रांगा.

                                                    बुथसंख्येत वाढ करण्याची आवश्यकता आहे.

प्रतिनिधी शंकर निंबारे , देवडोंगरी

देवडोंगरी: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी येथे (दि.२०) रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघ १२७ इगतपुरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक ३/२८८ या देवडोंगरी ग्रामपंचायत मधील मतदान केंद्राचे सकाळी ठिक ७:०० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली होऊन अखंडपणे रात्री ठिक ८:४५ वाजेपर्यंत सुरळीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. देवडोंगरी ग्रामपंचायतीचे मतदार संख्या एकूण १२४२ इतकी आहे. पैकी ७७% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

ग्रामपंचायत देवडोंगरी येथे मतदान बुथ संख्या एक असल्याने सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्राथमिक शाळेच्या आवारात मतदारांनी रांगा लागल्या होत्या. दुपारी तळपत्या उन्हात सुद्धा मतदार राजा रांगेत उभा राहुन मतदान प्रक्रिया सुव्यवस्थेत सुरळीतपणे चालू होते. संध्याकाळीपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाकी राहिलेले सर्व मतदार शाळेच्या आवारात रांगेत येऊन थांबले होते. सहा वाजेनंतर शाळेच्या आवाराचे गेटवर प्रशासनाच्या अधिक सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया चालू होते. संध्याकाळी अंधाराची चाहूल लागताच महिला तसेच पाडे-वाडी वस्तीवरुन आलेले मतदार वेळेअभावी मतदानाचा हक्क न बजावता पन्नास पेक्षा अधिक मतदार राजा नाईलाजाने घरी परतला. 

रात्री उशिरापर्यंत सुरळीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

मागिल पंचवार्षिक सन २०१९, लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा देवडोंगरी येथे रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया होऊन मतपेटी सिल करण्यात आली होती. तरी गावाची वाढती मतदार संख्या लक्षात घेऊन शासनाने वेळीच उपाययोजना म्हणून एक बुथ संख्या वाढवण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.