कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रचाराला चांगलाच जोर आला असून, ठिकठिकाणी शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवारातर्फे प्रचार करण्यात येत आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करण्याच्या हेतूने नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलेल्या शांतिगिरी महाराजांना आता नागरिकांचा पाठिंबा लाभत आहे. स्वामी शांतिगिरी महाराज यांनी काल जाहीर केलेल्या वचननामा घरोघर पोहोचविण्याचे काम भक्त परिवार करीत आहे. नाशिकला पहिल्यांदाच बिना खिशाचा खासदार लाभेल, असा प्रचार केला जात आहे.
वचननाम्यामध्ये शांतिगिरी महाराज यांनी जे संकल्प केले आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी शांतिगिरी महाराज यांना जनतेने यावेळी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भक्त परिवारातर्फे महाराज यांनी जाहीर केलेला वचननामा वाटप करून नाशिकच्या विकासासाठी शांतिगिरी महाराज हे कसे सक्षम उमेदवार आहेत. हे पटवून देण्याचे काम केले जात आहे.
.png)




Social Plugin