कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी काल महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. २२ मधील विहितगाव, सौभाग्यनगर, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब इत्यादि परिसरात काढलेल्या दौऱ्याचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले हेमंत आप्पा आगे बढो.. हम तुम्हारे साथ है। अशी घोषणाबाजी केली.
खा. गोडसे यांनी काढलेल्या रॅलीत माजी मंत्री बबनराव घोलप, आ. सरोज आहिरे, भाजप विधानसभा प्रमुख तनुजा घोलप यांसह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सकाळी निघालेल्या या रॅलीत प्रभागाच्या सर्व भागांमध्ये खा. गोडसे यांचे जोरदार स्वागत करताना महिलांकडून ठिकठिकाणी औक्षण केले गेले.
.png)




Social Plugin