कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२३ २४ च्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षा दि. २४ मे ते १२ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहे.
मुक्त विद्यापीठाच्या ६०१ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतलेले जवळपास ४ लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत परीक्षा केंद्रांना देण्यात आलेल्या असून, विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आलेली आहे. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.
.png)




Social Plugin