Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव लोकसभा मतदार संघात कोण बननार 'खासदार' चाळीसगावला कट्ट्यावर चर्चा रंगू लागल्या खटाखट


प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव

जळगाव लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानाच्या दिवशी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली. मतदानानंतर आता जळगाव लोकसभा मतदार संघात कोण निवडून येईल,अशी गणिते लावताना कट्यावर,फेसबुक, व्हाट्सअप, इतर ठिकाणी नागरिक लावताना दिसत आहे. त्यामुळे कट्ट्यावर जळगाव लोकसभा मतदार संघात कोण बनेगा 'खासदार' अशा चर्चा रंगू लागल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते हे 'मशाल' चिन्हाचे उमेदवार करण बाळासाहेब पवार (पाटील) एक ते दीड लाखाने निवडून येतील, असे दावा करत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे 'कमळ' चिन्हाचे उमेदवार स्मिताताई वाघ ह्या एक लाखाने निवडून येतील, असा दावा करत आहे. मतदानानंतर आता मतमोजणी येत्या मंगळवारी, ४ जूनला आहे. अशातच दोघे पक्ष थोड्या फरकाने का होईना आमचा उमेदवार निवडून येईल, असा दावा करतांना दिसत आहे. दुसरीकडे फेसबुक, व्हॉट्सअॅपची चर्चा पूर्ण मतदार संघात दिसत आहे. आता हे चित्र ४ जून रोजी पूर्ण स्पष्ट होईल, तोपर्यंत चर्चा, मतांची बेरीज, कोण उमेदवार विजयी होईल, अशा चर्चांना ऊत आला आहे.