वाई प्रतिनिधी - राहुल पिसाळ.
वाई तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी मंत्री आ.मदनराव पिसाळ आप्पा यांच्या सहचारिणी श्रीमती शशिकला पिसाळ यांचे दुपारी वृद्धापकाळाने निधन झाल्याचे वृत्त समजताच वाई तालुक्यावर शोककळा पसरली. आप्पाच्या पाठी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी या आदर्श उदाहरण होत्या.आप्पा सलग २० वर्षे १९८४ ते १९९५ राष्ट्रीय काँग्रेस मधून आमदार म्हणुन निवडून आले.
१९९५ ते ९९ अपक्ष तर १९९९ ते २००४ पर्यंत ते राष्ट्रवादीचे आमदार होते. २००२ ते २००४ या कालावधीत ते पणन व स्वयंरोजगार, परिवहंन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे पश्चात चिरंजीव कृषि भूषण सभापती शशिकांत दादा, स्नुषा अरुणादेवी, नातू विजयसिंह ,चार नाती, दोन भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सायं. आठ वाजता कृष्णाकाठावर वाकेश्वर( ता. वाई) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.





Social Plugin