प्रतिनिधी निंबी अनिकेत चांदणे
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, निंबी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य महाउत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व पुष्पांजली वाहून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांना विनम्र अभिवादन केले.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजप्रबोधनाचे कार्य आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रेखाताई भिवंटे, उपाध्यक्ष सहदेवराव वसत्कार, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेचे शिक्षक गणेश देशमुख सर, मातंग समाजाचे समाजसेवक सुरेश चांदणे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आनंददायी वातावरणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली.





Social Plugin