प्रतिनिधी पंकज सिरसाट-
मोरगाव भाकरे ते गायगाव मुख्य रस्ताचे काम गेले ३ महिन्या पासून अर्धवट राहिले असून आता पावसाळा सुरु होत असून रस्त्याचे काम तसेच डांबरी करण अपुरे राहिलेले आहे. त्यामुळे ते कधी होणार असा सवाल नागरिक करीत आहेत. मोरगाव भाकरे ते गायगाव हा रस्ता नेहमी वर्दळ चा रस्ता आहे, या रस्त्याने भौरद मार्गे अकोला जाणारा मुख्य रस्ता आहे, तरी गेले ३ महिन्यापासून रस्त्याचे डांबरी करण अपुरे राहिले असून ते काम पूर्ण कधी होणार हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
तसेच रस्त्यावर खड्डे पडले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या खड्ड्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याचे राहिलेले अर्धवट काम का सोडले हे कुणालाही समजले नाही.रस्त्याच्या डांबरी करण राहिल्याने नागरिकामध्ये तसेच विद्यार्थी मध्ये गैरसोय होत आहे. लोकप्रतिनिधी मतासाठी येतात, उद्घाटन चे नारळ हि फोडतात आणि थेट पुढच्या पाच वर्षांनी तोंड दाखवतात, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. चौकशी केली तर आचारसंहितेची करणेही दिली जातात.असे नागरिकांनी स्पट केले. येत्या पावसाळ्यात तरी रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा येथून वाहतूक करणे देखील धोक्याचे होऊ शकते.
पावसाळ्याचा आधी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे.जेणेकरून येथून प्रवास करणे विध्यार्थीना सोयीचे होईल.तसेच पावसाळ्यात येथील खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.--मोरगाव भाकरे सामाजिक कार्यकर्ते- गजानन वाघ.





Social Plugin