Ticker

6/recent/ticker-posts

चक्री वादळासह पाऊस परिसरात मोठे नुकसान

 


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 वादळी वारा ,सोसाट्याचा वारा ,चक्री वादळासह पाऊस यामुळे सोमवारी संध्याकाळी निढळ परिसरात मोठे नुकसान झाले .अनेक ठिकाणी झाडे पडली .घराचे पत्रे उडून  प्रचंड नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला झाडाखाली लावलेल्या गाडी ट्रॅक्टरवर झाडे पडून गाडीच नुकसान झाले .पाऊस थोडा वेळच होता पण प्रचंड वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले .आंबा पिकाचे नुकसान झाले .

.खरतर मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला.तरी या नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान ग्रस्त भागांचे ताबडतोब पंचनामे करून ताबडतोब आर्थिक मदत करावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.