(शेख बाबा लोणार प्रतिनिधी)
अंजनी खुर्द -मौजे अंजनी खुर्द ता लोणार जिल्हा बुलढाणा येथील घरगुती विज वापरा मध्ये व्होल्टेज खुप कमी असल्यामूळे मोटर पंप पाणी फेकत नाही, रात्री च्या वेळी पंखे, कुलर ला स्पीड नाही, लाईट ला मंदावता प्रकाश आहे.तसेच वारंवार विजेचा लपंडाव सुरू आहे ही समस्या मागील वर्षा पासून असुन याबाबत महावितरण अधिनस्त कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांची बेजबाबदारी कारणीभूत आहे. तसेच लोकप्रतिनिधी ची उदासिनता कारणीभूत असल्याची तक्रार मा.प्रधान सचिव, ऊर्जा मंत्रालय, मुंबई यांचेकडे श्रीमती केसरबाई नाना गायकवाड यांनी केलेली आहे. Voltage कमी व वारंवार विजेचा लपंडाव असल्यामुळे नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत. उन्हाळ्यात गरमी चा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महावितरण चे संपूर्ण महिन्याचे बिल भरूनही होल्टेज का कमी मिळत आहे तसेच थोड्या वार्याची झुळूक सुद्धा लाइन जात आहे असा संताप यावेळी नागरिक व्यक्त करत आहेत. विद्युत देयक मात्र संपूर्ण महिन्याचे व होल्टेज अतिशय नगण्य स्वरूपाचे. तरी या समस्येचे त्वरित महावितरण कडून निरासरण व्हावे अशी मागणी श्री गजानन माणिकराव गायकवाड, संघर्ष समिती, अंजनी खुर्द व नागरिक यांनी केलेली आहे.





Social Plugin