बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भगवान बुद्ध व डॉ . बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती विचार महोत्सव बुध मध्ये आयोजित करण्यात आला होता . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ यशवंत पाटणे होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुजय उदयसिंह राजेघाटगे होते .यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ .यशवंत पाटणे यांनी भारताच्या भूमीने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी दिलेला उज्वल प्रकाश म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहेत .बुद्धांचा ' बहुजन हिताय , बहुजन सुखाय ' हा संदेश भारतीय संविधानाच्या माध्यमातून देणारे महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे समस्त समाजाचे संजीवक शक्तिस्थान आहेत . ' फुलें , शाहु, आंबेडकर ' ही बुद्ध परंपरेची वैचारिक वंशवेल आहे . महात्मा फुलेंनी बहुजन समाजाला शिकून शहाणे करण्यासाठी हाती पाटी पेन्सिल दिली .राजश्री शाहुंनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण दिले तर डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी संविधान दिले .
भारतीय संविधान हा बुद्ध विचारांचा परिपाक आहे, तो लोकशाहीचा प्राण आहे . विस्कटलेल्या समाजाला 'प्रेम ,विश्वास आणि बंधुभाव' या धाग्याने एकत्र बांधण्याचे सामर्थ्य संविधानात आहे .संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे .
स्वातंत्र्य ,समता ,बंधुता सामाजिक न्याय या लोकशाही तत्त्वावर आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांच्या आणि डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांचे जतन आणि जागरण केले पाहिजे असे मत त्यांनी मांडले . अध्यक्षयीय भाषणात सुजय उदयसिंह राजेघाटगे डी .वाय . एस .पी . उपप्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश शिका , संघटित व्हवा, आणि संघर्ष करा याची जोपासना समाजात निर्माण व्हावी . भारतीय संविधान जगात श्रेष्ठ आहे . त्यामुळेच देश एकसंघ आहे तरूणांने नितीनमूल्याचे ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी व संस्काराची जोपासना करावी .सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बुधच्या सरपंच सौ सुजाता बोराटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभय राजेघाटगे , माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, प्राचार्य के डी पवार , .मुरलीधर का . खराटे . डॉ भीमराव शंकर बुधकर ,श्री श्रीधर राजाराम ठोंबरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सातारा तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खराटे, सौ प्राजक्ता कदम तसेच ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संचालक व सदस्य यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम याबाबत माजी प्राचार्य सुरेश भाऊ खराटे माहिती दिली .
तसेच प्रमूख पाहुणे व मान्यवरांचा परिचय व सुत्र संचलन मंगेश घाडगे यानी केले. सर्वप्रथम कु .सृजना भगवान सरवदे हिने भाषण सादर केले .प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आले त्यामध्ये सौ .सुप्रिया श्रीरंग बोराटे /शेंडे गटविकास अधिकारी वर्ग एक निवड झाल्याबद्दल सन्मान केला . तसेच श्री श्रीधर राजाराम ठोंबरे सय्यद पोलीस उपनिरीक्षक सातारा यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला . सौ .रमा व श्री सखाराम चंदू तोरणे श्री संत गजानन महाराज आश्रम पानवन शासनाचे कुठले अनुदान नसताना देखील आपल्या पेन्शन मधून आश्रम चालवात आहेत .याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला . यावेळी सौ . कांचन चंद्रकांत खराटे व चंद्रकांत बापू खराटे यानी सौ रमा श्री सखाराम चंदु तोरणे यानी हाती घेतल्या कार्याबद्दल आश्रमासाठी 10000 रू मदत केली .कु .अनुजा अजय भोसले कृषी सहाय्य पदी निवड ,अभिषेक धनंजय सूर्यवंशी राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये निवड , कु . किरण सत्यवान जाधव आरोग्य विभाग वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड , रोहित आणि रक्षिता याना महाराष्ट्र शासन ,छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त भावंडे यांचाही सन्मान केला . श्री गौतम खराटे तक्षशिलानगर यांना विकास रत्न पुरस्करांने सन्मानित करण्यात आले . तसेच कु . सृजना भगवान सरवदे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला , कु . सावली चंद्रकांत खराटे ज्ञानार्जन परीक्षा पुणे विभाग मध्ये लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल सन्मान केला .
तसेच प्रतिष्ठान च्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या व सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या निकालाचे वाचन भगवान सरवदे यांनी केले तर आभार मानण्याचे काम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय मंगेश दौलत खराटे यांनी केले .या कार्यक्रमाच्या नंतर महिलांसाठी खास होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मा राहुल कोळी सर आकाशवाणी निवेदक पुणे यांनी आपल्या निवेदनाने उपस्थितांचे मने जिंकली व यामध्ये सौ .रचना सिद्धांत बुधकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून मानाची पैठणी जिंकली .सो मनीषा तानाजी घाडगे यांनी दुसरा क्रमांक डिनर सेट जिंकला तसेच श्रीमती रेणुका सागर खराटे तृतीय क्रमांक मिळवून कुकर जिंकले यावेळी मोठ्या संख्येने स्त्रिया सहभागी झाल्या होत्या
.जयंती महोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी पार होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तक्षशिला नगर संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक यांनी खूप मेहनत घेतली व हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला . तसेच बुध व बुध पंचक्रोषी मधील नेहरू युवा मंडळ अध्यक्ष व सभासद, श्रीराम तालीम मंडळ पदाधिकारी, शिवप्रताप तरूण मंडळ पदाधिकारी , राजा शिवछत्रपती तरूण मंडळ , विक्रम विकास मंडळ पदाधिकारी सहभागी झाले होते .





Social Plugin