मारोती गाडगे/कटचिंचोली
गेवराई (बीड):-दिनांक २३/०५/२०२४गुरुवार रोजी छत्रपती संभाजी नगर ( प्रतिनिधी):-
महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना छत्रपती संभाजी नगर शहरातील कांचणवाडी परिसरातील गौतम नगर येथे करण्यात आली.. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. राजाराम बडगे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी प्रा. डॉ.रमेश गायकवाड सर. विशेष उपस्थिती रिपब्लिकन नेते प्रा. अनिल गवळे सर. प्रमुख पाहुणे माजी सभापती तथा नगरसेवक जनार्दनजी कांबळे . यावेळी झोपडपट्टीतील लोकांनीच बुद्ध ,फुले, शाहू, आंबेडकर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहेत.
समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही तत्व बुद्धांनीच सांगितलेली आहेत असे प्रतिपादन बडगे यांनी केले. मनुष्य प्राणीमात्रांना स्वतःचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर बुद्धांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असं उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना डॉ.रमेश गायकवाड म्हणाले. त्याचप्रमाणे प्रा. अनिल गवळे यांनीही उपस्थित समाजाला प्रेरणा देणारे बुद्धांचे विज्ञानवादी विचार समाज बांधवांसमोर मांडले. यावेळी संजय साळवे, किरण कांबळे, मुनीर खान ,राजू गवार्गुर, गौतम जाधव, शुभम इंगळे, गणेश पागोरे, करण दांडगे, विनोद कीर्तिकर, फकीरचंद शिरसाट, मोहन जाधव, राजू फुले, व फार मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.





Social Plugin