Ticker

6/recent/ticker-posts

असोला बुद्रुक येथे खरीप नियोजन कार्यक्रम संपन्न


(चिखली प्रतिनिधी)राजेंद्र मोरे

खरीप नियोजन  व मार्गदर्शन सभा मौजे असोल बुद्रुक येथे दिनांक 20/05/2024रोजी असोल संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित मा.  सभेस कृषी पर्यवेक्षक आर. ए. परिहार ,कृषी सहाय्यक एस.टी.किंगरे आणि बी.एस.पाटील उपस्थित होते. सदरील सभेस गावचे सरपंच ,उपसरपंच  आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मंडळ कृषी अधिकारी श्री परिहार साहेब यांनी बीज प्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी,  याविषयी सविस्तर  मार्गदर्शन केले, कृषी पर्यवेक्षक श्री किंगर साहेब यांनी खरीप पूर्व नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, मंडळ कृषी अधिकारी परिहार साहेब यांनी नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन केले, मंडळ कृषी अधिकारी परिहार यांनी शासकीय योजना याविषयी मार्गदर्शन केले, कृषी सहाय्यक किंगरे  यांनी उपस्थित शेतकरी, अधिकारी कर्मचारी तसेच गावातील पदाधिकारी सरपंच उपसरपंच यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले