•शेख बाबा लोणार प्रतिनिधी•
सुलतानपूर :- जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र लोणार सह अनेक महत्वपूर्ण ठिकाणी ये -जा करण्यासाठी रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या सुलतानपूर येथे गत अनेक वर्षांपासून प्रवाशी निवारा नसल्यामुळे प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सुलतानपूर येथून जात असलेले दोन राज्यमंहामार्ग तसेच स्थानिक विविध महाविद्यालये उच्च शिक्षणाची दालने नामांकित हॉस्पिटल बँका आणि शेजारील जिल्ह्याना जोडणारी रस्ते येथून असल्याने हजारो प्रवाशी येथून प्रवास करतात परंतु याठिकाणी प्रवाशी निवाराच नसल्याने एसटी ठराविक अश्या ठिकाणी न थांबता रोडवर ज्या ठीकाणी खुली जागा दिसेल तेथे थांबते यामुळे प्रवाश्यांचे हाल होतात व पाठलाग करून एसटी धरावी लागते तरी प्रशासनाने दखल घेऊन प्रवाशी निवारा बनवावा अशी जनसामान्यातून मागणी होत आहे.
.jpeg)




Social Plugin