बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] माध्यमिक शालांत परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयाने उज्वल यश संपादन केले. 138 पैकी 137 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 99.27 टक्के लागला.यामध्ये 12 विद्यार्थ्यांना 90टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले . 50 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीत 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील कु. सानिका नागनाथ देशमुख हिने 98.60 टक्के गुण मिळवून विद्यालयात व केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला कु. केतकी संतोष चव्हाण हिने 98.40% तर कु. श्रावणी संजय काटकर हिने 98 टक्के मिळवून केंद्रात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
मराठी विषयात प्रथम श्रावणी काटकर गुण 96 ,
संस्कृत विषयात प्रथम सानिका देशमुख गुण 100 ,
इंग्रजी विषयात प्रथम श्रुतिका फडतरे गुण 94 ,
गणित विषयात प्रथम केतकी चव्हाण गुण 99 ,
विज्ञान विषयात प्रथम सानिका देशमुख केतकी चव्हाण श्रावणी काटकर गुण 98,
सामाजिक शास्त्रे विषयात प्रथम सानिका देशमुख, श्रावणी काटकर, सायली डंबारके गुण 98 असे मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी,स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती,पालक संघ, पुसेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक,
पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.








Social Plugin