Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा फाटा जवळ शेताच्या बांधावर अज्ञात महिलेला तुराट्या- पराट्यात जाळल्याची घटना




ता.प्रतिनिधी आष्टा

माहुर तालुक्यातील  आष्टा फाट्याच्यानजीक असलेल्या माहूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते आष्टा फाट्याच्या दरम्यान मुख्य महामार्गापासून अवघ्या दोनशे मिटर अंतरावर असलेल्या हिवळणी येथील तुळशीराम राठेड यांच्या शेतात ही घटना घडली असून त्यांच्या शेताच्या बांधावर अज्ञात महिलेला तुराट्या व -पराट्यात  टाकून जाळल्याची घटना दि. ५ जून रोजी रात्री साडे आठच्या  सुमारास उघडली आली .दरम्यान माहुर शहरापासून नऊ कि. मी. अंतरावर असलेल्या  आष्टा - हिवळणी  फाट्यानजीक तुळशीराम राठोड यांच्या शेतात त्यांच्या विहिरीजवळ कापसाच्या व तुरीच्या प - याट्या ठेवलेल्या होत्या व जवळच  स्पिंकलरची ६१ पाईप आणि आठ नोझल ठेवलेले होते. तेथे रात्री ८ वाजताच्या सुमारात मोठी आग लागल्याचे दिसलयाने शेत मालक शेतात आले. त्यावेली काडीकच - याच्या ठिगा - याला लागलेली आग अथक प्रयत्न  करून विझल्यानंतर त्या ठिगा - याच्या  राखेत एक अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या  अवस्थेतदिसला. त्यावेळी त्यांनी तातडीने माहुर पोलीसांना माहीती दिल्यानंतर घटनस्थळावर पोलीसांनी येऊन पाहणी केली.घटनेची माहिती मिळताच माहुर पोलीस ठाण्याचे प्रभारी स पो.नि. शिवप्रकाश मुळे यांच्यासह सपोनी परगेवार पो . उपनि. आनंदराव वाठोरे तसेच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी घटनास्थळावर दाखल होवून घटनास्थळाची पाहणी केली. तर रात्री उशीरा फॉरेन्सिक पथक आल्याचेही समजते