Ticker

6/recent/ticker-posts

कृषी सखी शेती करिता चालते फिरते कृषी विद्यापीठ.



प्रतिनिधी संजय भरदु-

कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्या माध्यमातून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे व त्यांची शास्त्रज्ञ टीम कीटक शास्त्रज्ञ डॉ. डावरे, फळबाग तज्ञ निवृत्ती पाटील सर, हवामान तज्ञ व कृषी विद्या तज्ञ तुषार देशमुख सर, गृहशास्त्रतज्ञ डॉ.शुभांगी वाटाणे मॅडम, डॉ. देशमुख व सर्व सहकारी शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्ह्यातील ग्राम पातळीवर काम करणाऱ्या विस्तार कार्यकर्त्या कृषी सखी यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते सदर प्रशिक्षण हे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था मॅनेज हैदराबाद यांच्या द्वारा कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्याकडून देण्यात आले होते. पाच दिवसीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण सदर प्रशिक्षणामध्ये कृषी सखी यांना आदर्श जमीन ,सेंद्रिय पदार्थ नैसर्गिक पद्धतीने निर्मित कीटकनाशके, बुरशीनाशके बीज प्रक्रियेचे महत्त्व ,गांडूळ खत निर्मिती ,शेत बांधावरती नैसर्गिक निविष्ठा निर्मिती तसेच शेत बांधावरती सूक्ष्मजीव खतांची निर्मिती आधी विषयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह कारंजा लाड तसेच रिसोड येथे येथे पार पडले प्रशिक्षणाची किमया झाली काय तर आज संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कृषी सखी च्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी हा घरची बियाणे वापरत आहे तसेच बियाण्याचे जनरेशन चेक करत आहे आणि बीज प्रक्रिया करिता बीजामृत तयार करून ठेवत आहे तसेच किडींच्या नियंत्रणाकरिता दशपर्णी अर्क तयार करून ठेवत आहे ग्राम पातळीवरती कृषी विस्तार शिक्षणाचे चालती फिरते विद्यापीठ म्हणून कृषी सखी काम पाहत आहे कृषी विभागापेक्षा सुद्धा प्रबळ अशी जबाबदारी कृषी सखी निभावत आहे. अतिशय अल्पशा मानदानावरती कृषीची सेवा करून नवभारत निर्मिती करिता कृषी सखी महत्त्वाची भूमिका बजावत आहे यामधील एक ग्राम भामदेवी येथील कृषी सखी सौ नंदा मुंडे यांनी आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्व पटवून देत आहेत तसेच घरचे बियाणे वापरण्याकरता शेतकऱ्यांना प्रेरित करत आहे त्याकरिता बियाण्याची उगम क्षमता तपासणी चाचणी चे प्रात्यक्षिक गावामध्ये गल्ली गल्ली मध्ये होत आहे ग्राम भामदेवी तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील कृषी सखी चे कृषी विस्तार शिक्षणाचे कार्य हे वंदनीय आहे याचे सर्वस्व श्रेय कृषी विज्ञान केंद्र करडा चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ रवींद्र काळे यांना मिळत आहे दरम्यान वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी एक भाकीत केले होते की कृषी सखी हे कृषी विस्तार शिक्षणाचे सर्वात मोठे काम करेन हे सत्य होताना दिसत आहे यामध्ये उमेद व्यवस्थापन कक्षाचे जिल्हाप्रमुख यांचे सुद्धा तेवढेच योगदान आहे तसेच प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिके राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी रवींद्र गायकवाड मॅनेज मास्टर फॉर्मर यांच्या शेत बांधावरील लॅब मध्ये घेण्यात आले . व तांत्रिकदृष्ट्या प्रात्यक्षिके कृषी सखी यांना समजाविण्यात आले आज जिल्ह्यामध्ये चालते फिरते कृषी विद्यापीठ म्हणून कृषी सखी यांची ओळख होत आहे. त्याचे परिणाम आज प्रत्येक गावागावांमध्ये दिसत आहेत....