Ticker

6/recent/ticker-posts

फलटण ग्रामिण पोलीस व निर्भया पथकाचे जि.प.शाळा निरगुडी येथे मार्गदर्शन


प्रतिनिधी/प्रशांत सोनवणे 

 सोमवार दि. २४/०६/२०२४ रोजी पी.एम. श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडी येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया टिम फलटण विभागातून सौ.वैभवी भोसले यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या मुला व मुलींशी सुसंवाद साधून २०१२ च्या पोक्सो कायद्‌याअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन गुड टच, अँन्ड बैड टच याबाबत माहिती दिली तसेच पोलीस हेल्पलाईन नंबर दिले.मुलींनी आपले स्वतःचे संरक्षण कशा पद्धतीने केले पाहिजे तसेच मुलामुलींच्या सुरक्षितते- बाबत कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस कॉस्टेबल श्री.दत्तात्रय भिसे व पोलीस कॉस्टेबल सौ.लता पाडवी हे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला वसव, व शिक्षक सौ. जयश्री कदम, सौ सुषमा चिंचकर व उपशिक्षक श्री. शामराव निंबाळकर, श्री राजेंद्र सुतार, श्री. अभिजित रणवरे, श्री. सचिन काकडे श्री.शेखर चांगण व सर्व विद्यार्थ्यां उपस्थितीत होते.