Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली



प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड

      मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. यात आंदोलन करते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे या दोघांची प्रकृती खालावलेली आहे .राज्या सरकारच्या शिष्टमंडळानेही उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती .मात्र, लक्ष्मण हाके हे आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावलेली आहे .त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका असल्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे. 

     या आंदोलनातला राज्यभरातून पाठिंबा वाढला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

       मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची हमी सरकारने घ्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे .त्यासाठी ओबीसी समाजाची लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे मात्र या आंदोलनादरम्यान दोन्हीही आंदोलकाची तब्येत घालवलेली आहे .या  आंदोलकाची तपासणी डॉक्टरांच्या पथकाने केली आहे. यामध्ये लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला असल्याचे समोर आलेले आहे. तर हृदयविकार व पक्षघाताचा धोका असल्या ची भीती डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. 

        ओबीसींसाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड मधील केज येथून 200 वाहण्याचा ताफा वडीगोद्री येथे आला होता. लक्ष्मण हाके हे गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या समर्थन बीडमधून मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत आहेत .त्यांच्या समर्थनार्थ काल सायंकाळी बीड जिल्ह्यात रस्त्यावर काही करण्यात आला होता. 

        ओबीसी आरक्षणा धक्का लागणार नाही ,असे लेखी आश्वासन राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आले आहे. आपल्या मागण्यांवर हे आंदोलन ठाम आहे .मराठा समाजाला कुंभे प्रमाणपत्र दिले जात आहे. या माध्यमातून ओबीसी समाजाच्या आरक्षणात खुसखोरी होत असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान केला जातोय .त्यात आता सगळे सोयरे अंमलबजावणी करण्याची तयारी राज्य सरकारकडून केली जाते .त्यामुळे याचा ओबीसी समाजाचे आरक्षणावर परिणाम कसा होणार नाही. हे आम्हाला सांगावे ?असा प्रश्नही आंदोलन करतेने विचारला आहे. 

          ओबीसी समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोनवरून आंदोलन करते अशी चर्चा केली होती यात ओबीसी आरक्षणाचा कालवणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिली होती. मात्र ते कसे होणार याची सविस्तर लेखी माहिती देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मंत्री अतुल सावे, खासदार  कराड, खा भुमरे यांच्या शिष्टमंडळाने देखील हाके यांची भेट घेतली आहे .मात्र कायद्याला धरून नसलेल्या कॉम्बिनोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल? असा प्रश्न हे उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांना ओबीसी एससी एसटी समाजा द्वारे द्वेष आहे का ?असा सवाल आंदोलकांनी विचारला होता. 

         दरम्यान ओबीसी आरक्षण बचाव उद्देशांवर जालन्यातील लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू पासून त्यांच्या उपोषणाला ओबीसी बांधवांकडून पाठिंबा वाढत आहे .याच पार्श्वभूमीवर हिंगोलीहून शुक्रवार यांचा तालुका ओबीसी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी दखल होत आहे. यामुळे आणि वसमत मधील ओबीसी आंदोलन  वडीगोद्रीच्या दिशेने आज रवाना होऊ लागले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे  आज बीड हिंगोली छत्रपती संभाजी नगर आणि परभणी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी आंदोलन वडीगोद्री मध्ये  पोहोचले आहे.