बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चुरशीच्या लढाईत विदर्भातून शिंदे शिवसेनेचे एकमेव चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून येऊन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण (स्वतंत्र प्रभार ) राज्यमंत्री पदी वर्णी लागलेले नामदार प्रतापरावजी जाधव यांचा लोणार येथील पूर्वीच्या काळात राजकारणात समाजकारणात धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक बाबुरावजी (आश्रुजी) मापारी यांच्या निवासस्थानी नुकताच पारिवारिक सत्कार करण्यात आला.
लोणार येथील ज्येष्ठ नागरिक आश्रुजी मापारी ज्यांना दोन-तीन जिल्ह्यात बाबुरावजी मापारी या नावाने राजकारणी , समाजकारणी, अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी ओळखतात . पूर्वीच्या काळी लोणार ग्रामपंचायत , जिल्हा परिषद , विधानसभा , लोकसभा असेल कोणत्याही पक्षाची मंडळी लोणार ला आल्यानंतर बाबुरावजी मापारी यांचे आशीर्वाद घेतले नाही असे कधी झाले नाही . आता त्यांनी राजकारणातून अलिप्त होऊन पूर्ण वेळ अध्यात्माला दिला आहे.
ज्यांचा परिवार आज धार्मिक , सामाजिक ,राजकीय , व्यापार , शेती , शैक्षणिक क्षेत्रात जिल्हाभर ओळख निर्माण करून एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करणारा म्हणून ओळखला जातो . अजून या परिवारासोबत नातेसंबंध स्नेहाचे संबंध असल्याने नामदार प्रतापरावजी जाधव यांनी त्यांच्या घरी येऊन त्यांचे आशीर्वाद घेतले . या ठिकाणी मापारी परिवाराकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी बाबुरावजी मापारी , गीताबाई मापारी , शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी , शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त राजेश मापारी , शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, व्यापारी विनायक मापारी , बबनराव मामा जाधव , युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव , मयुरीताई जाधव , शंतनू मापारी , विशाल मापारी , अजिंक्य मापारी , आदित्य मापारी , ओम मापारी व कुटुंबातील सर्व लहान-मोठे मंडळी हजर होते .





Social Plugin