प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
२६ मे रोजी च्या मलकापूर परिसरात नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आपल्या पुढाकारातून मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत ४ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.
विजांच्या कडकडात वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसाचा मलकापूर तालुक्यासह शहराला चांगलाच तडाखा बसला आहे,या नैसर्गिक आपत्तीत २६ मे रविवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तब्बल ५० मिनिटांच्या थरारात मोठे नुकसान झाले,दरम्यान मंदिरातील कळस टिनशेडला भेदत अंगावर पडल्याने शहरातील भीम नगरातील रवींद्र विश्राम निकम वय ६० वर्ष यांचा मृत्यू झाला होता तर झाडाची फांदी अंगावर पडल्याने बेलाड येथील निवृत्ती गणसराम इंगळे वय ६५ वर्ष यांचा मृत्यू झाला,त्याचप्रमाणे समर्पण लॉन येथे मंडप पडून विजय निवृत्ती चोपडे हे गंभीर रित्या जखमी झाले होते
उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला होता,नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यां पैकी बेलाड येथील निवृत्ती इंगळे यांच्या वारसाला ४ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी तहसीलदार राहुल तायडे व मंडळ अधिकारी कुलवंतसिंह राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते.तर भीम नगर येथील रवींद्र निकम यांच्या वारसाच्या नावे बँक खात्यात ४ लाख रुपये जमा करण्यात आले त्याचप्रमाणे विजय चोपडे यांच्या वारसाच्या नावे ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे,परंतु अद्याप पावेतो विजय चोपडे यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसून त्यांचे वारस सुद्धा घरी नसल्याने त्यांचे अर्थसहाय्य त्यांच्या वारसांना देता आले नाही अशी माहिती महसूल यंत्रणेच्या वतीने देण्यात आली.





Social Plugin