Ticker

6/recent/ticker-posts

सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन १ महिन्यासाठी स्थगित



 प्रतिनिधी आकाश जळके 

 शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी सगेसोयरे आणि इतर सर्व मागण्यांसंदर्भात सरकारला एक महिन्याची मुदत द्यावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

     मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची विनंती मान्य करीत सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. जर सरकारने १३ जुलैपर्यंत अंमलबजावणी केली नाही तर मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरून सर्वांना हिसका दाखवणार. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी  आहे.