प्रतिनिधी आकाश जळके
महबूबनगर अंबड येथील अनस मेहमूद शेख व अस्फीयान वाजेद सय्यद या दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचे स्वप्न असणाऱ्या MBBS साठी शासकीय कोट्यातून पात्र ठरले आहेत. विशेष सांगावेसे वाटते की, अस्फीयान सय्यद या विद्यार्थ्याचे वडील वेल्डिंगचे काम करतात, आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने,कठोर मेहनतीने,रात्रंदिवस अभ्यास करून अस्फीयान याने आकाशाला गवसणी घातली आहे.
आवर्जून सांगावेसे वाटते की, अनस शेख आणि अस्फीयान बालपणीची जिवलग मित्र आहेत. शालेय शिक्षण नीट परीक्षेचा अभ्यास या दोघांनीही सोबतच पूर्ण केले आणि आता एमबीबीएसला देखील दोघांनी सोबतच गवसणी घातली आहे!
त्यांच्या या नेत्र दीपक कामगिरी बद्दल कौतुकाची थाप देण्यासाठी कर्तबगार जाकिर भाई डावरगावकर, अनिल भालेकर ,इंजिनीयर समीर शेख, रफिक शेख (राजू टेलर), भाई मस्तकीम, अथर खान, रिजवान डावरगावकर, मजूर भाई डावरगावकर, वाजिद शेख, इस्माईल डावरगावकर यांच्या समवेत उपस्थित राहून दोन्ही ही गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला!अंबड शहर वाशी म्हणून त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो, विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे!
अनस शेख आणि अस्फीयान सय्यद यांनी आयुष्यात अशीच उत्तुंग भरारी घेत यश संपादन करत राहो, कीर्ती मानाचे नवनवे विक्रम स्थापित करून यशाचा झेंडा त्रिलोकी फडकत राहो.!हीच ईश्वरचरणी प्रार्थना





Social Plugin