Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाणा चे खासदार प्रतापराव जाधव यांना अखेर मंत्रीपद



प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर,

सलग चारवेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम करणारे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. दरम्यान सायंकाळी ते शपथ घेणार आहेत.बाजार समितीमधील अडत व्यापारी ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा आजवरच राजकीय प्रवास रहाला. मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार तथा राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये क्रीडा व युवक कल्याण तसेच पाटबंधारे राज्यमंत्री (लाभ व विकास) खाते सांभाळत त्यांनी जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढविण्यावर भर दिला होता.