विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम (विदर्भ प्रदेश) ची सभा श्री. शिवाजी विद्यालय व क. महा. वाशीम येथे दि. १० जून ला समिती चे जेष्ठ पदाधिकारी बाबुसिंगजी पवार काका यांचे अध्यक्षतेखाली तर जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांच्या उपस्थितीत पार पडली.
वाशीम तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी मागिल तिन चार वर्षापासून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात सातत्याने अमरावती उपोषण, आझाद मैदान मुंबई उपोषण, हिवाळी अधिवेशन नागपूर मोर्चा, विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोर्चे काढले. परंतु महायुती सरकारने आपल्या मागण्या संदर्भात आश्वासन शिवाय काही केले नाही.
ऑक्टोबर २४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणून त्यापूर्वी करावयाचे आंदोलन संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येऊन सर्वाचे मत जाणून घेण्यात आले असता काही प्रकल्पग्रस्त शेतकरी याच्या मते आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात यावे तर काही प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मते वाशीम येथे आंदोलन करण्यात यावे. या प्रमाणे रवि पाटील,शेखर जाधव, भागवत भोडणे,सोनू पवार,बाळू कोहर, वामनराव मारुटकर, राजू तिवारी,राजेन्द्र लोखंडे,वसंतराव मुसळे,मुसाबेग,नंदूभाऊ भिसडे,नामदेव खंडारे,मनोहरराव मते, बालाजी मुसळे इ. प्रकल्पग्रस्तांनी सुचना मांडल्या.
यावेळी समिती पदाधिकारी बाबुसिंगजी पवार काका, शिवदास पाटील ताठे, महादेवराव निंबोकार,मुख्तार खान पटेल, राधेश्याम शिरसाठ, संजय भरदूक इ.नी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी एकसंघ राहुन लढा देण्यासाठी सज्ज असावे असे सांगितले.
शेवटी जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांनी आंदोलना संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल व त्यासंदर्भात आपणास कळविण्यात येईल. तसेच या सरकारच्या काळातील हे शेवटचे आंदोलन असल्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या सभेस भाऊरावजी मापारी मा. सरपंच, बाबारावजी घुगे, अनिल गंगावणे,भागवत भोंडणे, सौ.चंद्रभागा वानखडे,सौ.मारुटकर काकू, आत्माराम खुळे, बाळू कोहर, बाबाराव चव्हाण, विठ्ठल सदार,हरिश्चंद्र गोदमले, शेखर जाधव,राजेश तिवारी,परशराम झळके सर, दलपत चव्हाण, अरविंद पवार, संदीप धुळधुळे सह मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते
.jpg)




Social Plugin