Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती याशनी नागराजन यांची बोपर्डी स्मार्ट शाळेस सदिच्छा भेट.



वाई प्रतिनिधी - राहुल पिसाळ.

                             आज वाई तालुक्यातील बोपर्डी येथील जिल्हा परिषद आदर्श आणि उपक्रमशील शाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी भेट दिली. त्यावेळीं सोबत गटविकास अधिकारी श्री विजयकुमार परीट, वाई बांधकाम चे उप कार्यकारी अभियंता श्री. संजय जाधव, पाणीपुरवठा उप कार्यकारी अभियंता श्री मेटकरी, शिक्षणाधिकारी श्री साईनाथ वाळेकर हे सुध्दा उपस्थित होते.
                  बोपर्डी येथील शाळा ही कायम शैक्षणिक गुणवत्ता, नवनवीन उपक्रम, खेळ या सर्व बाबतीत नेहमी पुढाकार घेत असते. सातारा जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परीषद मार्फत नावीन्यपूर्ण स्मार्ट शाळा राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधा सोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परीषद कायम प्रयत्नशील आहे . ग्रामस्थांनी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शाळेतील विविध उपक्रमांना भेट देत विद्यार्थी मल्लखांब आणि स्क्रीन वर शाळेचा आढावा घेतला. मल्लखांब प्रात्यक्षिक पाहून सर्व जण भारावून गेले.
त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल पिसाळ यांनी स्वागत केले, सोबत त्यांचा सर्व टीम बोपर्डीचा स्टाफ, उपशिक्षक उपस्थित होते.बोपर्डी ग्रामस्थां कडून सुध्दा सत्कार करण्यात आला,सरपंच श्री. शंकरराव गाढवे, उपसरपंच श्री रणजित गाढवे, उद्योजक अविनाश गाढवे, ग्रामस्थ उपस्थीत होते.