बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] -
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये नवीन विद्यार्थ्याचे ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले .यावेळी बुधच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.सुजाता बोराटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष.चंद्रकांत चव्हाण ,सदस्या सौ सुनीता बागेकरी ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिह राजेघाटगे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संकल्पक , संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे ,स्वामी विवेकानंद व संस्थामाता सुशीलदेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले सौ . सुजाता बोराटे ,चंद्रकांत चव्हाण सर ,प्राचार्य अंकुश भांगरे व उपस्थित मान्यवर व पालक यांच्या हस्ते झाले .
यावेळी दहावी मध्ये प्रथम तीन आलेले विद्यार्थी प्रथम आदित्य विठ्ठल फडतरे , द्वितीय -श्रुती किरण कदम व पालक किरण कदम तसेच तृतीय जान्हवी अनिल जगदाळे व पालक सौ गौरी अनिल जगदाळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . तसेच बारावी मधील प्रथम तीन कु जगताप सानिका दादासो, कु . गांधी मनाली रसिकलाल, शेंडे यश जयवंत या विद्यार्थी व पालकांचा सत्कार व अभिनंदन केले . तसेच इयत्ता आठवी मधील राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थी व पालक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कु . तन्वी विकास पात्रेकर व विकास पात्रेकर , श्रेया वैभव लोहार व वैभव लोहार , कु . अस्मिता चंद्रकांत चव्हाण व चंद्रकांत चव्हाण यांचा सत्कार सुजाता बोराटे व प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या हस्ते करण्यात आला .तसेच उपस्थित पालक सौ स्वाती महेश जंगम , सौ अरुणा नाना बोराटे , सौ समिना मंगौस जामदार सौ सुनिता बागेकरी यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी प्राचार्य अंकुश भांगरे यांनी मागील वर्षी राबविलेले उपक्रम व चालू वर्षी राबवणार असलेले उपक्रम व नियोजन या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच सरपंच सुजाता बोराटे यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व नवगतांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या .श्री चंद्रकांत चव्हाण सर यांनी विद्यार्थी यांनी पालक व शिक्षक यांच्या मार्गदर्शना उज्जवल यश मिळवले आहे .त्याप्रमाणे चालू वर्षाही त्याप्रमाणे नियोजन करून व मोठ्या प्रमाणात हे यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली . विद्यालयाचे ग्रंथपाल श्री धनवडे नामदेव यांचे यांनी पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करून त्याचे वितरण मान्यवरांच्या केले गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवान सरवदे व श्री दत्तात्रय काळुखे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री संजय कांबळे यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .





Social Plugin