प्रतिनिधी आकाश जळके
अंबड.
नगरपरिषद अंबडच्या खुले जागेवरील छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्रावरील मैदानावर मा. उपविभागीय अधिकारी श्री दीपक पाटील व अंबड तालुक्यातील युवा आणि जेष्ठ योग साधकांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दि. 21 जून रोजी सामूहिक योग साधना व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित रीदमिक योगा नृत्य स्पर्धा घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरी करण्यात आला.
रोटरी क्लब अध्यक्ष श्री राजकमल करवा, श्री पुरुषोत्तम सोमाणी, श्री अमर लाहोटी, सचिव श्री विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ योग साधक डॉ कल्याण जोशी, प्रा चितांबर मेटकर, श्री घनश्याम शिंदे, श्री. राजेंद्र देशमुख, ऍड रंगनाथराव काफरे आणि मोठ्या संख्येने नागरिक, आदर्श इंग्लिश विद्यालय जामखेड, कैलासवासी दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालय, अंबड आणि मत्स्योदरी विद्यालय अंबड च्या विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती. आर्ट ऑफ लिविंग चे योग शिक्षक पांडू तात्या शिंदे यांनी योग सत्र घेऊन आपली सेवा दिली. श्री अनिल भालेकर, श्री कैलास नाटकर, श्री आकाश जळके आणि देवा चित्राल यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.





Social Plugin