Ticker

6/recent/ticker-posts

विसापूर येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा रिंगी चिंगी ग्रुप कडून सन्मान.



  बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

   विसापूर ता खटाव जि सातारा येथे संत गुंडोजी बाबा विद्यालय विसापूर व इतर शाळेचे विद्यार्थी  मार्च २०२४ इयत्ता १०वीच्या परिक्षेत चांगले गुण प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थीनी व विद्यार्थी यांचा रिंगी चिंगी ग्रुप विसापूर यांचे वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला . विसापूर येथील श्री वाघेश्र्वरी व  नवलाई मंदिरामध्ये रिंगी चिंगी ग्रुपचे अध्यक्ष किशोर साळुंखे, राजेश साळुंखे, ,गणेश साळुंखे, तानाजी शिंदे , महेश साळुंखे  ,सतीश कदम आकाश साळुंखे ,राहुल साळुंखे ,भरत कोळी, रिंगी चिंगी ग्रुपचे संस्थापक माजी उपसरपंच मुरलीधर साळुंखे ,विसापूर गावचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत ,ज्ञानेश्वर साळुंखे ,सैनिक कॅप्टन प्रवीण सावंत, यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थी 

    सन्मान करण्यात आला यामध्य कु .दिक्षा प्रवीण. सावंत 97.30%, ,कु. क्षमता विनोद जाधव  93.20%, कु. मेघना निलेश साळुंखे  93.00%, रोहन सुहास सावंत 92.6० %. ,सिध्दांत संतोष सावंत  91.20 % ,कु्  सृष्टी रामदास साळुंखे  90.20 % , कु. दिक्षा दिपक फडतरे  83.20 % ,  कु. पल्लवी हणमंत लोंढे 81.80%, कु. आरती कुंडलिक मदने 81.40 %, तन्मय दिलीप कदम 80.40%, कु. सायली तानाजी साळुंखे 80.20%   यांना पुष्पगुच्छ व पेढे शाल श्रीफळ देण्यात आले तर पुढील शिक्षणासाठी  डॉक्युमेंट फाईल, स्काय बॅग अशा विविध वस्तू देण्यात आल्या . यावेळी विसापूरचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत, शिवाजी सावंत, दीपक साळुंखे, लक्ष्मण सावंत, चंद्रकांत साळुंखे व विविध मंडळाचे पदाधिकारी रिंगीचिंगी ग्रुपचे सदस्य गावचे ग्रामस्थ पालक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.