Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा फुले हायस्कूल मोकभणगी विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम


भारत शिंदे (मोकभणगी प्रतिनिधि)

  मोकभणगी ता.कळवण येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित महात्मा फुले हायस्कूल मोकभणगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्ड मार्च २०२४ च्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली 

  यामध्ये प्रामुख्याने दिक्षा अनिल गांगुर्डे हिने ९२%  गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर आहेर स्नेहा कैलास हिने ८९.६०% गुण मिळत द्वितीय क्रमांक मिळविला तसेच भावेश सुनील शेवाळे याने ८७% गुण मिळवत तृतीय तर भावेश संतोष पवार याने ८६.४०% मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला व हर्षदा सुरेश शेवाळे हिने ८४.८०%गुण मिळवत पाचवा क्रमांक संपादन केला.

    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रेय गोविंदा पवार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका  श्रीमती व्ही आर अहिरे तसेच शिक्षक गायकवाड एम एम ,शिंदे जी वी,  पवार जे यु, गावित पि के, इंगळे के ई, कापडणीस डी जे व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले