Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंञ्याच्या पदाधीकार्‍याचा उपोषणाचा तिसरा दिवस


स्थानिक प्रशासनासह महायुतीतील नेते फिरकले नाही.

  ता.- (प्रतिनिधी) माहुर

माहूर तालुक्यात वाळु तस्करांनी हैदोष घातल्याचा आरोप करीत लांजी येथील डेपो वरुण अवैध मार्गाणे चांगल्या दर्जाची वाळू विदर्भातील वाशिम,पुसद,महागांव सारख्या शहरासह परिसरात अव्वाच्या सव्वा भावात विक्री करीत असल्याचा व घरकुल लाभार्थ्यांना माती मिश्रीत व रोडा वाळु वितरीत करुण शासनाच्या नियमाला बगल देत मनमाणी करीत असल्याचा आरोप करीत ना.मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे दोन पदाधिकारी २७ जून पासून माहूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे.सदरील उपोषणकर्ते हे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे असून देखील कोणीही उपोषणाची दखल घेण्यास तयार नाही. तहसीलदार महसुल प्रशासन यांनी जबाबदारी झटकली असुन या प्रश्नावर आमची जबाबदारी नाही. असे तोंडी उत्तर दिल्याने उपोषणार्थींना एकनाथा अजब तुझे सरकार म्हणण्याची वेळ आली आहे.

माहूर तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी तिन दिवसापासून बसलेले विनोद सुर्यवंशी पाटील हे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे तालुका संघटक असुन प्रशांत पुरी हे याच पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख असून हे दोघे २७ जून २०२४ रोजी पासून माहुर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या प्रमुख मागण्यात तालुक्यातील सर्वच घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास दर्जेदार वाळूसाठा उपलब्ध करून द्या, वाळू डेपोतून फक्त तालुक्यातील गरजूंनाच वाळू द्या,चढ्या दराने जिल्ह्याबाहेर विकली जाणारी वाळू तातडीने थांबवा व वाळू डेपोत सहभागी असलेल्या चर्चेतील रेती तस्करांची तसेच महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍याची,कर्मचार्‍याची मोबाईल सी.डी.आर तपासणी करुण व डेपो चालकासह सर्वसांबंधितावर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागणीने महसूल प्रशासनातील भ्रष्ठ अधिकारी व वाळू तस्करीतील काही राजकिय मंडळीचा समावेश असल्याने त्यांचे या मागणीने चांगलेच धाबे दणानले असल्याची चर्चा असून आमरण उपोषणातील उपोषणकर्त्यांना अद्दल घडविण्याच्या मानसीकतेत असलेल्या सर्वसंबंधीतांनी या आमरण उपोषणाकडे दुसर्‍या दिवशी हि पाट फिरवली असल्याचे सांगितले आहे.त्यातच या विभागाचा काया पालट करु असे दिवा स्वप्न दाखवणार्‍या तसेच मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचेकडे साकडे घालून निधी लाटणार्‍या काही राजकिय मंडळीला मुख्यमंञ्याच्या पक्षातील पदाधिकारी असलेल्या उपोषणकर्त्याला साधी भेट हि देता आली नसल्याने "मुख्यमंञी कमजोर,कि या भागातील महायुतीतील राजकिय मंडळी मुजोर अशी म्हणण्याची वेळ आता उपोषणकर्त्यावर आली आहे.