Ticker

6/recent/ticker-posts

इंदिरा गांधी माध्यमिक विदयालय नूतन इमारत भूमिपूजन उत्साहात संपन्न



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव या नामांकित संस्थेच्या इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पुसेगावच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पुसेगाव येथे नुकताच श्री सेवागिरी मठाचे मठाधिपती १०८ प .पू. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मंगलमय वातावरणात संपन्न झाला . 

शासनाची सदर विद्यालयास मुलामूलींचे सहशिक्षणास  नुकतीच परवानगी मिळाली आहे . इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या मुला मुलींना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त भावनेतून संस्थेने या विद्यालयाच्या नूतन इमारतीचा संकल्प केला आहे . 

या कार्यक्रमास  संस्था अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव , खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, श्री सुभाषराव जाधव, डॉ . श्री सुभाषराव आगाशे, श्री विश्वनाथराव जाधव, श्री विष्णूपंत खटावकर, श्री विलासराव जाधव, श्री योगेशराव देशमुख, श्री एस आर. पाटील, श्री जयंतराव जाधव , श्री विजयजी जाधव, देवस्थानचे चेअरमन श्री रणधीर जाधव, सरपंच श्री घनशाम मसणे, उपसरपंच श्री विशाल जाधव, सौ दिपाली तारळकर, सौ शकुंतला जाधव, श्री राजेंद्र पाटील, श्री हणमंत घनवट, श्री नारायण घनवट, श्री बाळासाहेब गाढवे, श्री मु. का . खराटे, श्री एस .के. जाधव, श्री प्रमोद जगदाळे विविध शाखांचे मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .