प्रतिनिधी :- आकाश जळके
घनसावंगी ते कुंभार पिंपळगाव रोडवरील हॉटेल शिवनेरीसमोर देवीदहेगाव फाट्यावर एक इसम हा विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद साबळे यांना आज मिळाली होती.
त्यावरून त्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा मारून कारवाई करीत असताना पोलिसांना पाहून एक संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न लागला. यावेळी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अलीम कदीर अत्तार (वय 27, कु. पिंपळगाव) असे सांगितले. यावेळी त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे आढळून आला आहेत. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात कलम 3/25 अर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी आनंद साबळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस कर्मचारी विठ्ठल वैराळ, सुनील वैद्य, संजय वैद्य, दादाराव काळे, नारायण घुणावत, बाळासाहेब मंडलिक यांनी ही कामगिरी केली आहे.





Social Plugin