पतिनीधि रविंद्र गव्हाळे
मलकापूर शहरामध्ये नांदुरा रोड लागूनच असलेल्या रामवाडी व जाधव वाडी मध्ये अज्ञात चोरट्यांनी फोरव्हिलर व टू व्हीलर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.रविवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर गाडी उभे केली असता चोरट्यांनी गाडी लंपास केली.हॅण्डल लॉक केलेली एक्टिवा टू व्हीलर व फोर व्हीलर घरासमोरून चोरी गेल्यामुळे स्थानिक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
गणेश नारायण सातपुते वय 35 राहणार जाधव वाडी यांनी नेहमीप्रमाणे रात्री आपल्या घरासमोर त्यांचे MH28AX1141 हे टू व्हीलर उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली, तसेच रामवाडी परिसरात वास्तव्यास असलेले राजकुमार पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर त्यांची MH12HN6527 क्रमांकाची चार चाकी उभी केली होती रविवार सकाळी त्यांच्या अंगणातील चार चाकी वाहन दिसून आले नाही आपले वाहन चोरी झाल्याचे लक्षात येता पाटील यांनी शहर पोलिसात धाव घेतली व गुन्हा दाखल केला त्यावरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पोलीस करत आहे.





Social Plugin