Ticker

6/recent/ticker-posts

बुलढाणा जिल्ह्यात ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे-- आ.राजेश एकडे यांची मागणी


बुलढाणा जिल्ह्यात ज्वारी खरेदीचे उ‌द्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली असता या मागणीची दखल घेत नामदार भुजबळ यांनी या मागणी संदर्भात तातडीने उचित कार्यवाही करणेबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांना तात्काळ सुचित केले.

  राज्य सरकारने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी ची घोषणा केली,त्या नुसार खरेदी सुरू केली,बुलढाणा जिल्ह्याला ३० हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उ‌द्दिष्ट देण्यात आले. परंतु हे उ‌द्दिष्ट उत्पादनाच्या प्रमाणात अतिशय कमी आहे,कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे तसेच मलकापूर मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारीचा पेरा जास्त केल्यामुळे उत्पादनात जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे,मलकापुर विधानसभा मतदारसंघामध्ये ३५०० शेतकरी बांधवांनी नोंदण्या केल्या आहे,तर खासगी बाजार पेठेत ज्वारीचे भाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होत आहे,त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याकरीता ज्वारी खरेदीचे उ‌द्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी मागणी थेट मंत्रालयात नामदार भुजबळ यांच्याकडे केली असता या संदर्भात तातडीने संबंधित विभागाच्या सचिवांना योग्य ती कारवाई करणे बाबत निश्चित करण्यात आले आहे.