Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर गुन्हा दाखल.


प्रतिनिधी आकाश जळके

              मराठवाड्यात अनेक मल्टीस्टेट वाल्याने ठेवीदारांचे पैसे बुडून गाश्या गुंडाळला.महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा ज्ञानराधा मल्टीस्टेटने  52 शाखेच्या माध्यमातून सहा लाख ठेवीदारांना 10 हजार कोटीचा चुना लावला.गेल्या आठ महिन्यापासून सुरेश कुटे हे वारंवार खोटे आश्वासन देऊन, शासन प्रशासन, तसेच आंदोलन कर्ते यांना लेखी खोटी माहिती देऊन फसवणूक करत आले.

सुरेश कुटे यांच्यावर विश्वास संपल्यानंतर अंबड येथे ठेवीदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट वर गुन्हे दाखल करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2024 पासून अंबड तहसील समोर उपोषण सुरु करून त्या दरम्यान धरणे आंदोलन, रस्ता रोको, सामूहिक आत्महत्या निवेदन , मुंडन  इत्यादी स्वरूपाचे विविध आंदोलन केले. शेवटी उशिरा का होईना पोलीस प्रशासनाने अंबड येथील सर्वसामान्य ठेवीदार यांच्या आंदोलनाच्या मागणीमुळे  दिनांक 16 जून 2024 रोजी  ज्ञानराधा मल्टीस्टेटचे  अध्यक्ष सुरेश कुटे,  उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, आशिष पाटोदेकर,  जिल्हा व्यवस्थापक रमेश जोगदंड, अंबड शाखेचे मॅनेजर विजय ढोणे यांच्यार विविध कलमाखाली तसेच  एम.  .पी.आय.डी  कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ठेवीदार ज्ञाय हक्क कृती समितीचे सचिव डॉ. एल .बी.सावंत मुख्य फिर्यादी असून 12 फेब्रुवारी पासून आंदोलन करणारे जवळपास दीडशे सह फिर्यादी आहे आंदोलन करणारे आंदोलन कर्ते यांची एकूण जवळपास 8 ते दहा कोटी रक्कम आहे. अंबड तालुक्यातील जवळपास 70 ते 80 कोटीची ठेवीदाराची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी मध्ये नमूद केलेले आहे.

              अंबड तालुक्यातील सर्वसामान्य ठेवीदार हक्काचा घामाचा पैसा मिळण्यासाठी 12 फेब्रुवारी पासून आंदोलन करत आहे. शेवटी पोलीस प्रशासनाने 16 जून 2024 रोजी गुन्हा दाखल केला  ठेवीदारांना आपल्या हक्काचा कष्टाचा पैसा मिळण्यासाठी संघटित करण्याचं काम ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष भगवान रेगुडे, उपाध्यक्ष दिनकर उघडे, रामेश्वर त्रिमुखे, अंबादास खोमणे, 

तात्याचा वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मण खंडागळे, आकाश सातपुते, शिवाजी वाडेकर, डॉ .पायमोडे, प्रशांत सबनीस, आशाबाई खरात, सुरेखा चव्हाण,संजय अग्रवाल, मच्छिन्द्र डेरे, हिरालाल लठे, लक्ष्मण धनाडे, नारायण खरात, कार्तिक सरकार, शेख जब्बार, हरिभाऊ पिराने, गुलाबराव उबाळे,कमलबाई खरात, आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केले.