भारत शिंदे(ग्रामीण प्रतिनिधी)
मोकभणगी ता.कळवण येथील म. वि.प्र. संचलित महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात मोकभणगी या विद्यालयात.सायकल वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय गोविंदा पवार जेष्ठ सदस्य श्री. कौतिक आनंदा पवार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अहिरे व्ही. आर यांनी केले.
सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षात मार्च -2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम पाच येणाऱ्या कु. दीक्षा अनिल गांगुर्डे,स्नेहा कैलास आहेर,भावेश सुनील शेवाळे,भावेश संतोष पवार, हर्षदा सुरेश शेवाळे या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झालेली कुमारी. तनुजा गौतम शेवाळे या विद्यार्थिनीचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
तसेच शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत खेड्यावरून येणाऱ्या इयत्ता आठवीच्या एकूण नऊ विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय गोविंदा पवार,सदस्य श्री. कौतिक आनंद पवार, श्री पंडित शंकर पवार श्री.संतोष पवार, श्री. केदा सुलोचने, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे व्ही. आर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुल पी. एम यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री गायकवाड एम एम यांनी मांडले.





Social Plugin