Ticker

6/recent/ticker-posts

जीवन विद्या मिशन, मुंबई यांनी घेतला जालना जिल्हा दत्तक



प्रतिनिधी आकाश जळके 

जीवन विद्या मिशन, मुंबई यांनी जालना जिल्ह्या दत्तक घेऊन आज मंगळवार दि.25/06/2024 रोजी सकाळपासून अंबड तालुक्यात विविध ठिकाणी अनेक शाळांमध्ये जाऊन व्यक्तिमत्व विकास, अभ्यासाच्या युक्त्या, यशाचं रहस्य, कौटुंबिक सुख, राष्ट्रभक्ती, विश्व प्रार्थना घेऊन मार्गदर्शन केले.

     तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार चे प्रणेते समाज सुधारक सद्गुरु वामनराव पै यांच्या विचारांवर आधारित स्वानंद योग आणि जीवनासाठी आवश्यक ज्ञान म्हणजे जीवन जगण्याची कला तसेच जीवनविद्या मधील विविध कोर्स ची माहिती दिली.

1) सकाळी 7:30 वा. इयत्ता पाचवी ते आठवी च्या 1700  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मत्स्योदरी विद्यालय, अंबड . 

2) सकाळी 10:00 वा. ओम शांती विद्यालय, अंबड 400 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

3) 12:00 वा इयत्ता नववी ते दहावी च्या 2 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मत्स्योदरी विद्यालय, अंबड.

     3:00 वा माननीय गटशिक्षणाधिकारी श्री गोविंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन लेवल वन चा स्वानंद योग हा फाउंडेशन कोर्स पंडित गोविंदराव जळगावकर नाट्य गृहामध्ये घेण्याचे ठरविण्यात आले असून त्याची तारीख रविवार दि.25/06/2024 निश्चित करण्यात आली.

 जीवनविद्या भांडूप मुंबई  शाखेचे श्री संतोष सोरट, श्री लवू ठुकरुल आणि श्री जितेन्द्र मसुरकर यांनी मार्गदर्शन केले. 

       अंबड तालुक्यातील शाळांमध्ये जीवनविद्या मिशन चा परिचय करुन देण्यासाठी श्री संतोष सावंत, श्री जयंत वैद्य, श्री आकाश जळके, श्री कैलास नाटकर, श्री जालिंदर बटुळे, श्री निलेश लोहिया, साहेब लॉज चे श्री तुकाराम जामदरे, डॉ मुरलीधर जाधव, श्री पांडुरंग जामदरे, मुख्याध्यापक संघाचे श्री विलास टकले, पंचायत समिती शिक्षण विभागाचे श्री नवनाथ दाने आणि श्री देवा चित्राल यांनी परिश्रम घेतले.