Ticker

6/recent/ticker-posts

घिर्णी येथील शेतकऱ्यांनी दिले महावितरण ला निवेदन


     प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे 

           26 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे गावातील घरांचे तसेच शेतामधील फळ झाडांचे मोठी नुस्कान झाले. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे. घिर्णी येथील बागायती शेती करणारे शेतकरी खूप प्रमाणात आहे. प्रामुख्याने काळा ऊस, कपाशी, भाजीपाल्या आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पेरतात परंतु अनेक दिवसापासून शेतामध्ये वीज नसल्या कारणामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे विद्युत तारा व खांबे हे जमीन दोस्त झाल्यामुळे गेल्या वीस दिवसापासून शेतामध्ये वीज नाही त्यामुळे अनेक शेतातील पीक हे कोमजून पडले आहे. त्याच अनुषंगाने आज घिर्णी गावातील शेतकऱ्यांनी आपली समस्या ॲड. हरीश रावळ मा. नगराध्यक्ष यांना सांगितले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपविभागीय अभियंता मलकापूर यांना संबंधित बाब लक्षात आणून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या समस्येचा निराकरण करा असे निवेदन दिले.

निवेदन देताना ॲड.हरीश रावळ, ग्रा.सदस्य संदीप राजपूत, विष्णू वनारे, प्रकाश धोरण,मनोज बगाडे, चेतन जंगले, प्रवीण राजपूत, शुभम भोपळे, आदी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.